राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते
कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे साजरा झाला. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण झाले.
या समारंभाप्रसंगी आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.रामास्वामी एन, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.गणेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान श्रीमती आर.विमला, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.संजय कुमार, संचालक लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन, नवी मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.सुरेशकुमार मेकला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवी मुंबई पोलीस पथक, सीबीडी- बेलापूर येथील भारती विद्यापीठ, ज्ञानपुष्प विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते सॅनिटरी पॅड व्हेन्डींग व डिस्पोजल मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनचे व्यवस्थापन श्रीकृपा स्वंयसहायता बचतगटाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री.महेंद्र वारभुवन, उप आयुक्त (महसूल) श्री. सिध्दाराम सालीमठ, उपायुक्त (रोहयो)श्री.अशोक पाटील, उपायुक्त (पुर्नवसन) श्री.अरुण अभंग, उपायुक्त (पुरवठा) श्री.दिलीप गुट्टे, उपायुक्त (विकास) श्री.भारत शेंडगे, उपायुक्त (आस्थापना) श्री.गणेश चौधरी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचेसूत्रसंचलन निंबाजी गिते यांनी केले.
No comments:
Post a Comment